नारायण नागबली पूजा
नारायण नागबली हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा विधींपैकी एक विधी आहे. या विधी मध्ये दोन वेग वेगळ्या विधींचा समावेश असतो १) नारायण बली पूजा आणि २) नागबली पूजा. नारायण नागबली पूजा या दोन्ही पूजांचे एकत्रीकरण असते. पूजे वेळी दोन्ही विधी सोबत करणे फार महत्वाचे असते तेव्हाच त्या विधीचा पूर्ण फायदा होतो आणि याला पितृ दोष निवारण विधी असेही म्हंटले जाते. नारायण बली हि पूजा आपल्या मेलेल्या पूर्वजांचा आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी केली जाते ( पितृ दोष निवारण साठी ) तर नागबली पूजा हि साप मारल्याचा पापातून मुक्त होण्यासाठी केली जाते. नारायण नागबली हि महत्वाची पूजा इतर कोठेही केली जात नाही तर फक्त महाराष्ट्रातील नाशिक या जिल्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर जवळींल अहिल्या गोदावरी संगम आणि सती महा स्मशान येथेच केली जाते. १२ दिव्य ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला एकदा भेट दिल्यास सद्गती प्राप्त होते असा लोकांचा विश्वास आहे . हि जागा महादेवाला समर्पित आहे तसेच येथून पवित्र गोदावरी नदीचा उगम हि होतो. त्यामुळे इतर अनेक पूजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर ची भूमी खूप पवित्र मानली जाते. त्र्यंबक या गावाला ताम्???पत्रधारी पंडित चा वारसा लाभलेला आहे. येथील सर्व पूजा फक्त ताम्रपत्रधारी पंडितच करतात. या पंडितांना नानासाहेब पेशवाणी त्र्यंबकचे अस्सल, ज्ञानी पंडित असल्याचा पुरावा म्हणून ताम्रपत्रे बहाल केली होती ती ताम्रपत्रे आज पर्यंत जतन करून ठेवण्यात आलेली आहेत.
पूर्वजांना मोक्ष प्राप्ती न होण्याची करणे :
अनेक कारणांमुळे मेल्या नंतर त्या व्यक्तींचा आत्मा अतृप्त राहतात, त्यांना मोक्ष प्राप्ती होत नाही. असे होण्याची अनेक करणे असतात. खूप जुना ग्रंथ गरुड पुराण यात नारायण नागबली पूजा का केली पाहिजे, त्याचे महत्व काय याची अनेक कारणे सांगितली आहेत. पूर्वजांना मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठीच नारायण नागबली पूजा केली जाते
कधी मरणा वेळी त्या व्यक्तीचा आपण संपर्कात नसतो किव्हा आपण त्या व्यक्तीचा अंत्य संस्कार विधी करू शकत नाही अशा वेळी त्या व्यक्तीचा मरणाचे मूळ कारण आपल्याला माहिती नसते किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अचानक झाला तर अशा वेळी त्या व्यक्तीचा अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात या दोन्ही कारणांमुळं त्या व्यक्तीचा आत्म्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. किंवा एखाद्या भयावह अपघाता नंतर अंत्य संस्कारात त्या व्यक्तीचा शरीराचे सर्व भाग जाळले गेले नाही , किंवा अंत्य संस्कार विधी हा योग्य पद्धतीने केला गेला नाही तरी त्या व्यक्तीची आत्मा अशांत राहते आणि येथेच भटकत राहते. दुर्मरण आलेल्या व्यक्तीला देखील मोक्ष प्राप्ती होत नाही. दुर्मरण अनेक प्रकारचे असतात.
१) अंगावर वीज पडून मृत्यू होणे
२) अपघाती मृत्यू
३) पाण्यात बुडून, उंची वरून पडून मृत्यू
४) आत्महत्या, खून
५) आग लागून किंवा करंट बसून मृत्यू होणे
६) आजारी मांडून मृत्यू होणे इत्यादी
नारायण नागबली विधी का केला जातो :
जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्म्यांना मोक्ष प्राप्ती होत नाही तेव्हा अशा आत्मा दुःखी असतात. त्या दुःखी आत्मा पुढील पिढ्यांचा आयुष्यात अनेक समस्या निर्माण करतात. आपल्याला यश प्राप्ती साठी आपल्या पित्रांसाठी हा विधी करणे महत्वाचे असते. नारायण नागबली पूजेने त्यांचा आत्मा शांत आणि आनंदी होऊन त्यांना सद्गती मिळते. नारायण नागबली पूजेने आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि आपला पितृ दोष दूर होऊन आपल्या आयुष्यात सुख, समाधान, शांती येते.
नारायण नागबली पूजा विधी :
हा विधी फक्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा तीर्थ स्थळीच केला जातो. ताम्रपत्रधारी पंडितांचा मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पडला जातो. या विधी पूर्ण होण्यास ३ दिवसांचा कालावधी लागतो.
पूजेचा पहिला दिवस :
कुशावर्त कुंडातील पवित्र गोदावरी नदीचा पाण्याने अंघोळ करून आणि महादेवहच ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन हा विधी सुरु केला जातो. अहिल्या गोदावरी संगम येथे हा विधी सुरु होतो.
प्रथम विष्णू पूजन केले जाते आणि त्या नंतर ब्रह्मदेवाची चांदीप्रतिमा , विष्णुवाची सुवर्णप्रतिमा , शंकरवाची ताम्रप्रतिमा , यमराजाची लोहप्रतिमा, प्रेत शिसे प्रतिमा कलशांवर स्थापन करून पूजा केली जाते, त्या नंतरहवन , १६ पिंडाचे श्राद्ध, काकबली, पालाशविधी, मनुष्य रुपी पुतळ्याचे अंत्यसंस्कार इत्यादी विधी केल्या जातात.
पूजेचा दुसरा दिवस :
महिकोधिष्ट श्राद्ध, सपिंडी श्राद्ध आणि नागबली विधी दुसऱ्या दिवशी केले जातात
पूजेचा तिसरा दिवस :
आधीचा २ दिवसांचा पूजेचे नकारात्मकता दूर करण्यासाठी गणेश पूजन केले जाते.
सोन्याचा नागाची पूजा करून तो गुरुजींना समर्पित करतात.
आणि भोजन आणि प्रसाद वाटप करून पूजा संपन्न होते.
नारायण नागबली पूजेचे फायदे :
नारायण बली पूजा हि मुख्यतः पितृ दोष निवारण साठी केली जाते. पितृ दोषा मुळे माणसाला सहन करावे लागणारे अनेक समस्यांचे निवारण नारायण नागबली पूजे मुळे होते. पितृ दोषामुळे माणसाला दुःख, अपयश, लग्न होण्यास अडचणी, लग्नानंतर मूल होण्यास अडचणी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. नारायण नागबली पूजे मुले या सर्व समस्या दूर होऊन माणसाचा आयुष्यात सुख, समाधान आणि यश येऊ लागते. नारायण नागबली पूजेमुळे पूर्वजांचा अतृप्त आत्म्यांचा श्रापातून मुक्तता होते, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पूर्वजांना सद्गती प्राप्त होते.
नारायण नागबली पूजा करताना पाळले जाणारे काही नियम :
१) पूजा मुहूर्ताचा एक दिवस आधी त्र्यंबकेश्वर मध्ये उपस्थित राहावे.
२) पूजा सुरु झाल्यावर त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून जाउ नये.
३) पुरुषांनी पांढरे धोतर , गमचा परिधान करावा.
४) स्त्रियांनी पांढरी साडी परिधान करावी
५) पूजेचा दिवसांत सात्विक भोजन खावे. (फक्त कांदा लसूण नसलेले )
६) धूम्रपान, सिगरेट सारखी व्यसने करू नये.
७) पूजा संपन्न झाल्यावर एक दिवस सुतक पाळावे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग फक्त महादेवाचे प्रतीक नाहीतर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक आहे. त्र्यंबकेश्वर चा पवित्र भूमीवर केली जाणारी पूजा हि नेह मी लाभदायकच ठरते. ताम्रपत्रधारी पंडित हे तेथील अस्सल पंडित आहे त्यांचा हातून केलेली कोणतीही पूजा व्यर्थ जात नाही.
त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या इतर पूजा : १) काल सर्प दोष २) नारायण नागबली पूजा ३) त्रिपिंडी श्राद्ध पूजा ४) कुंभ विवाह ५) रुद्राभिषेक ६) महामृत्युंजय मंत्र जाप इत्यादी. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा ऑफिसिअल वेबसाइट वरून तुम्ही तुम्हाला हवी असलेली पूजा बुक करू शकता आणि ताम्रपत्रधारी पंडितांशी संपर्क साधू शकता.